महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

५ हजार दिव्यांनी उजळले तळवडेचे श्री देव सिद्धेश्वर मंदिर

03:50 PM Nov 16, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांचा उपक्रम

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील सकल मराठा समाज तळवडे यांच्या वतीने मराठा समाज आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी मराठा समाज बांधवांतर्फे तळवडे येथील ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी पाच हजार दिवे लावण्यात आले. यावेळी मराठा समाज ऐक्यवर्धक संघ मार्फत योग्य नियोजन करण्यात आले होते यावेळी मंदिराभोवतीचा परिसर एक प्रकारे सुंदर असा दिसत होता मराठा बांधवातील एकजूट अशीच कायम राहावे व मराठा आरक्षण सरकारकडून मिळावे असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी यावेळी मराठी बांधवांना मार्गदर्शन केले जर आरक्षण मिळाले तर गोरगरीब मराठी बांधव यांना याचा फायदा होणार आहे असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.

Advertisement

यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन पुकारले आहे .त्याला पाठिंबा देण्यासाठी तळवडे गावातील हजारो मराठा बांधव यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी ते आंदोलन सुरू केले आहे त्याला तळवडे येथील मराठी बांधवांतर्फे पूर्ण पाठिंबा देण्यात आलासिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी बांधवांतर्फेद या मराठा आरक्षण संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. यातून मराठा बाधव यांची एकजूट दाखवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तळवडे येतील मराठा सकल मराठा समाज तर्फे रॅली काढून सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी यावेळी माहिती तळवडे येथील मराठा समाज ऐक्यवर्धक संघ पदाधिकारी यांनी दिली.

Advertisement
Tags :
# talwade # lamps # tarun bharat news# diwali
Next Article