For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धेश्वर ग्रॅनाईट टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण

10:06 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धेश्वर ग्रॅनाईट टी 20 क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण
Advertisement

बेळगाव : युनियन  जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत  सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर बेळगावात प्रथमच प्रकाश झोतात होणाऱ्या या स्पर्धेच्या चषकाच्या अनावरन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, स्पर्धा पुरस्कर्ते प्रमोद कदम, दीपक राजूकर, मिहीर पोतदार, नागेश मडिवाळ, जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर, पोतदार रॉयल्सचे निशिल पोतदार, इंडियन बॉईज हिंडलगाचे काशिनाथ नाईक व रामचंद्र मनोळक। के आर शेट्टी किंग्सचे प्रणय शेट्टी, साईराज वॉरिअरचे महेश फगरे, रोहन ट्रेडर्स बीएससीचे ऋषिकेश कदम, सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानाचे विठ्ठल गवस आदी उपस्थित होते. आला प्रारंभी  जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बंडगी व सचिव प्रसन्ना सुंठणकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी विजेत्या, उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक बक्षिस खेळाडूंना देण्यात येणाऱ्या चषकांचे अनावरण करण्यात आले. स्पर्धेतील सामने दिवसा व रात्री खेळण्यात येणार असून पहिला सामना दुपारी 2.30 वाजता तर सायंकाळचा सामना सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार आह.s सहभागी 8 संघात 28 साखळी सामने व चार- बाद पद्धतीचे सामने होणार असून स्पर्धेत एकूण 32 सामने होणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.