महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक स्पर्धा : रोहन ट्रेडर्स क्वालिफायर फेरीत

10:02 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने एलिमिनेटर सामन्यात भाटे वॉरियर्स संघाचा 75 धावानी एकतर्फी पराभव करत दुसऱ्या क्वालिफायर लढतीसाठी आपली पात्रता सिद्ध केली. राहुल नाईक याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भाटे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून रोहन ट्रेडर्स बीएससी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. या संधीचा पुरेपूर फायदा उठवताना रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने 20 षटकात 7  बाद 185 धावा केल्या. 10 षटकात 4 बाद 48 अशी केविलवाणी अवस्था असताना रोहन ट्रेडर्स संघाच्या नशिबाची पुरेपूर साथ लाभलेल्या राहुल नाईकने चौफेर टोलेबाजी करताना 36 चेंडूत 6 षटकार 5  चौकारांसह 75 धावांची स्फोटक फलंदाजी केली. भाटे वॉरियर्सच्या क्षेत्ररक्षकानी यावेळी राहुल नाईकचे चार सोपे झेल सोडले. सिद्धेश असलकरने 28, अक्षय जुवेकरने  3 चौकार 1 षटकारांसह 20 धावा केल्या. सिद्धेश व राहुल यांनी पाचव्या गड्यांसाठी 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भाटे वॉरियर्सतर्फे फरान पाटीलने 3, तर रोहित पाटील, हार्दिक ओझा व वैष्णव संगमित्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल  खेळताना भाटे वॉरियर्स संघाचा डाव 16 षटकात 110 धावात आटोपला. त्यात माजिद मकानदारने 20, अमेय भातकांडेने 19 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स संघातर्फे कृष्णा बागडेने 3 तर हर्ष पटेल, सौरव सामंत व अक्षय पाटील यांनी प्रत्येकी 2 तर अक्षय जुवेकरने एक गडी बाद केला. सामनावीर राहुल नाईक व इम्पॅक्ट खेळाडू हर्ष पटेल यांना प्रमुख पाहुणे मिलिंद भातकांडे, डॉ. श्रीरंग भोगण व आनंद सोमनाचे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या क्वालिफायर लढतीत रोहन ट्रेडर्स बीएससी संघ पोतदार रॉयल सी सी आय संघाशी दोन हात करणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article