साईराज वॉरियर्सकडे सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक
रोहन टेडर्स बीएससी उपविजेता: अगंदराज हित्तलमनी मालिकावीर ,ओमकार वेर्णेकर सामनावीर
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिध्देश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेचे अंमित सामन्यात बलाढ्या साईराज वॉरिअर्स संघाने रोहन ट्रेडर्स बीएससी संघाचा 23 धावांनी पराभव करत निर्विवाद विजेतेपद पटकावले सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषकावर आफले नाव कोरले. सामनावीर ओमकार वेर्णेकर तर मालिकावीर अंगदराज हितलमनी चषक देऊन गौरविण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम लढती आधी दिवंगत माजी रणजीपटू सुभाष कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अंतिम लढतीत साईराज वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडीबाद 162 अशी माफक धावसंख्या रचली. त्यात झीशानअली सय्यदने 2 चौकार तीन षटकारांसह 39, सुधन्वा कुलकर्णीने 29 चेंडूत 4 चौकारांसह 38, कर्णधार ओमकार वेर्णेकरने 16 चेंडूत 2 चौकार 1 षटकारांसह 23, केदारनाथ उसुलकरने 3 चौकारांसह 21 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स बीएससी संघातर्फे अक्षय पाटील व कृष्णा बागडी यांनी प्रत्येकी 3 तर सौरव सामंतने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहन टेडर्स बीएससी संघ ठराविक अंतराने फलंदाज बाद झाल्याने 20 षटकात 9 गडीबाद 139 धावांपर्यंतच मजल मारली. त्यात सुदीप सातेरीने 3 चौकारांसह 32, मनीकांत बुकितगारने 20 चेंडूत 4 चौकार 1 षटकारांसह 32, सौरव सामंतने 3 चौकारांसह 21 तर आकाश कटांबळेने 2 चौकारांसह 19 धावा केल्या.