For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराज वॉरियर्सकडे सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक

10:19 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
साईराज वॉरियर्सकडे सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक
Advertisement

रोहन टेडर्स बीएससी उपविजेता: अगंदराज हित्तलमनी मालिकावीर ,ओमकार वेर्णेकर सामनावीर

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित  सिध्देश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेचे अंमित सामन्यात  बलाढ्या साईराज वॉरिअर्स संघाने  रोहन ट्रेडर्स बीएससी संघाचा 23 धावांनी पराभव करत निर्विवाद विजेतेपद पटकावले सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषकावर आफले नाव कोरले. सामनावीर ओमकार वेर्णेकर तर मालिकावीर अंगदराज हितलमनी चषक देऊन गौरविण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या  अंतिम लढती आधी दिवंगत माजी रणजीपटू सुभाष कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अंतिम लढतीत साईराज वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडीबाद 162 अशी माफक धावसंख्या रचली. त्यात झीशानअली सय्यदने 2 चौकार तीन षटकारांसह 39, सुधन्वा कुलकर्णीने 29 चेंडूत 4 चौकारांसह 38, कर्णधार ओमकार वेर्णेकरने 16 चेंडूत 2 चौकार 1 षटकारांसह 23, केदारनाथ उसुलकरने 3 चौकारांसह 21 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स बीएससी संघातर्फे अक्षय पाटील व कृष्णा बागडी यांनी प्रत्येकी 3 तर सौरव सामंतने एक गडी बाद केला.  प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहन टेडर्स बीएससी संघ ठराविक अंतराने फलंदाज बाद झाल्याने 20 षटकात 9 गडीबाद 139 धावांपर्यंतच मजल मारली. त्यात सुदीप सातेरीने 3 चौकारांसह 32, मनीकांत बुकितगारने 20 चेंडूत 4 चौकार 1 षटकारांसह 32, सौरव सामंतने 3 चौकारांसह 21 तर आकाश कटांबळेने 2 चौकारांसह 19 धावा केल्या.

साईराज वॉरियर तर्फे शुभम भादवण्णकरने 3, ओमकार वेर्णेकर व संतोष सुळगे-पाटील यांनी प्रत्येकी 2 तर व रब्बानी दफेदार व सुधन्वा कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कर्ते प्रमोद कदम, धारवाड विभागाचे माजी समन्वयक अविनाश पोतदार, आप्पासाहेब गुरव, युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर, महेश फगरे, अविनाश खन्नुकर, संजय मोरे, विठ्ठल गवस,  सुधाकर पाटणकर यांच्या हस्ते विजेत्या साईराज वॉरियर्स व उपविजेत्या रोहन टेडर्स बीएससी संघाना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर वैयक्तिक बक्षीस विजेत्या अंतिम सामन्यातील खेळाडू शुभम भादवण्णकर, अंतिम सामन्यातील सामनावीर ओमकार वेर्णेकर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज राहुल नाईक, उत्कृष्ट गोलंदाज कृष्णा बागडी, स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू वैभव कुरीबागी, स्पर्धेतील आशस्वाशक खेळाडू तनिष्क नाईक, स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संतोष सुळगे-पाटील,  मालिकावीर अंगदराज हितलमनी चषक देऊन सन्मान करण्यात आला. पंच म्हणून राजू बडवाण्णाचे व मन्सूर बडेभाई व स्कोरर म्हणुन सुजित शिंदोळकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे, आरिफ बाळेकुंद्री, अभिषेक असलकर यांनी समालोचन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद चव्हाण, चेतन बैलूर, अनिल गवी, महांतेश देसाई, ज्योती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.