For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई रणजी संघाचे नेतृत्व सिद्धेश लाडकडे

06:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई रणजी संघाचे नेतृत्व सिद्धेश लाडकडे
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

2026-27 च्या रणजी क्रिकेट हंगामासाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी मधल्या फळीतील फलंदाज सिद्धेश लाडची नियुक्ती मुंबई क्रिकेट संघटनेने जाहीर केली आहे. यापूर्वी शार्दुल ठाकुरकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील इतर वनडे आणि टी-20 स्पर्धांसाठी मुंबई संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादवकडे त्यांच्या उपलब्धतेनुसार सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 34 वर्षी  शार्दुल ठाकुरवर सलग सामन्यांमुळे अधिक ताण पडत असल्याने त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी होऊ शकली नाही. तो नवा चेंडू हाताळताना प्रत्येक सामन्यात त्याला अधिक षटके टाकावी लागली. तसेच त्याने बऱ्याच सामन्यात उपयुक्त फलंदाजी केली. रणजी स्पर्धेच्या सलग दुसऱ्या हंगामात मुंबई संघाच्या कर्णधारांमध्ये बदल करण्यात येत आहे.

2025-26 मध्ये अजिंक्य रहाणेच्या जागी शार्दुल ठाकुरची कप्तानपदी नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या जुलैमध्ये अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीचा निर्णय घेतला होता.  2023-24 च्या रणजी हंगामात रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भचा पराभव करत रणजी करंडकावर विक्रमी 42 व्यांदा नाव कोरले होते. अलिकडेच भारतीय टी-20 संघाचा कप्तान निवड समितीने बदलला. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2024-25 च्या कालावधीत सय्यद मुस्ताक अली टी-20 स्पर्धा जिंकली होती. तसेच 2025-26 च्या कालावधीत रणजी स्पर्धेत ठाकुरच्या नेतृत्वाखाली मुंबईने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 2026 च्या रणजी हंगामाला 11 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. मुंबईचा इलाईट ड गटातील सलामीचा सामना चंदीगडबरोबर खेळविला जाईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.