For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरच्या सिद्धार्थ, युवराजने मालदिवमध्ये फडकवला तिरंगा

07:17 PM Jun 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोल्हापूरच्या सिद्धार्थ  युवराजने मालदिवमध्ये फडकवला तिरंगा
Kolhapur
Advertisement

साऊथ एशियन बॉडीबिल्डींगमध्ये सिद्धार्थने तर मेन्स फिजिकमध्ये युवराजने पटकावले रौप्य पदक

कोल्हापूर प्रतिनिधी

मालदिव येथे सुरू असलेल्या 14 व्या साऊथ एशियन बॉडी बिल्डींग अॅण्ड फिजिक स्पोर्टस् चॅम्पियनशीप कॉम्पिटीशनमध्ये कोल्हापूरच्या दोघा तगड्या बॉडी बिल्डर्सनी अप्रतिम कामगिरी करत देशाचा तिरंगा लहरला. कॉम्पिटीशनमध्ये बॉडी बिल्डींग या प्रकारातून प्रतिनिधीत्व केलेल्या सिद्धार्थ राजेंद्र कुरणेने 70 ते 75 किलो गटात बहारदार पोझींग करत रौप्य पदकाला गवसणी घातली. तसेच युवराज प्रकाश जाधवनेही कॉम्पिटीशनमधील मेन्स फिजिक प्रकारातही अफलातून पोझींग करत रौप्य जिंकले. युवराज हा 175 सेंटीमीटर ऊंची या गटातून कॉम्पिटीशनमध्ये उतरला होता. पदकांना गवसणी घालताना दोघांनीही यजमान मालदिवसह श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, भुतान या देशांच्या बॉडीबिल्डर्सना फाईट दिली आहे.

Advertisement

स्पोर्टस् मिनिस्ट्री ऑफ मालदिवच्या वतीने या कॉम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनने निवडलेल्या भारतीय संघातून सिद्धार्थ व युवराजने कॉम्पिटीशनमध्ये प्रतिनिधीत्व करत पदकाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला आहे. बॉडीबिल्डर युवराज हा कोल्हापुरातील जीवबा नाना जाधव पार्क येथील तर सिद्धार्थ हा गिरगाव (ता. करवीर) येथील रहिवाशी आहे. हे दोघेही सामान्य कुटुंबातील तऊण आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी अखंडीत सराव कऊन स्पर्धेत पदके मिळण्यालायक पिळदार शरीर कमवले आहे. मालदिवमधील कॉम्पिटीशनपर्यंत झेप घेण्यापूर्वी सिद्धार्थने चेन्नई येथे एप्रिल महिन्यात झालेल्या राष्ट्रीय पातळीवर बॉडीबिल्डींग स्पर्धेत सातवा क्रमांक पटकावला होता. तसेच युवराजने वास्को द गामा (गोवा) येथे एप्रिल महिन्यातच झालेल्या 13 व्या फेडरेशन कप बॉडीबिल्डींग व मेन्स फिजिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

दोघांच्याही कामगिरीची इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनने दखल घेतली होती. याचबरोबर या दोघांनाही मालदिवमधील कॉम्पिटीशनसाठी भारतीय संघात स्थान दिले होते. त्यांनी ही फेडरेशनने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत कॉम्पिटीशनमध्ये आपल्यासह भारतीय संघासाठी रौप्य पदक जिंकून मालदिवमध्ये देशाचा तिरंगा लहरला. बक्षीस वितरण समारंभात दोघांनाही रौप्य पदक, चषक व प्रमाणपत्र बक्षीस देऊन गौरवले. सिद्धार्थ व युवराजला कॉम्पिटीशनमध्ये बहुमोल कामगिरी करण्यासाठी कोल्हापुरातील बॉडीबिल्डर कोच राजेश वडाम यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.