कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Crime News: सिद्धार्थनगर राडा प्रकरण, तोडफोडप्रकरणी 400 जणांवर गुन्हे दाखल

02:08 PM Aug 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

याचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कनेरकर करत आहेत

Advertisement

कोल्हापूर : सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री दोन गटात दगडफेक होऊन वाहनांची जाळपोळ केली होती. याप्रकरणी दोन्ही गटाच्या 400 जणांवर गुन्हे दाखल केले. याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल एकनाथ कळंत्रे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांकडून घटनेचे व्हिडिओ पाहून आणखीन संशयितांची नावे तपासण्याचे काम सुरु आहे.

Advertisement

संशयितांवर बेकायदेशीर जमाव करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, वाहनांची तोडफोड करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, पोलिसांवर दगडफेक करुन जखमी करणे या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कनेरकर करत आहेत.

सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त रस्त्यात स्टेज घातले होते. यावरुन दिवसभर तणाव होता. दुपारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी या स्टेजवर कारवाई केली. त्यानंतर राजेबागस्वार परिसरातील तरुणांनी पुन्हा फलक उभारुन साऊंड लावून हुल्लडबाजी केली.

यावेळी दोन गटात राडा झाला. त्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करत वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यामध्ये ४ पोलिसांसह १० जण जखमी झाले होते. सुमारे दोन तासानंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आली होती.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

आसिफ शेख, शाहरुख शेख, कौशीक राजू पटवेगार, सोहेल पटवेगार, तणवीर मुजावर, नौशाद मुजावर, शाहरुख रिक्षावाला, तौसीफ शेख, अब्दुल रौफ सिध्दीकी, अश्पाक गॅसवाला, जरीब इनामदार रिक्षावाला, सोहेल शेख, समीर मिस्त्री गॅरेजवाला, परवीन बशीर शेख, आश्रफ सिध्दीकी, इजाज शेख, सद्दाम महात, अश्पाक नायकवडी, इकबाल सरकवास, बिलाल शेख, मुन्ना सिध्दीकी (सर्व रा. राजेबागस्वार) यांच्यासह २०० जणांवर तर सिध्दार्थनगर मधील सूरज कांबळे, अभिजीत कांबळे, शुभम कांबळे, विजय पटकारे, महेश कांबळे, लखन कांबळे, गणेश कांबळे यांच्यासह २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील जखमी

परहाज बशीर नायकवडी, निहाल रहिमतुल्ला शेख, सद्दाम महात, अश्पाक शब्बीर नायकवडी, इकबाल दौड चरकवास (सर्व रा. राजेबागस्वार दर्गा), पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस कर्मचारी आबीद खुदबुद्दीन मुल्ला हे जखमी झाले आहेत.

लाखाचे नुकसान

शनिवारी रात्री झालेल्या तोडफोडीच्या घटनेमध्ये चार वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये दोन वाहने पेटविण्यात आली तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. या वाहनांचा पंचनामा करण्यात आला. सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. ही सर्व वाहने पोलीस प्रशासनाने तातडीने अलंकार हॉल येथे जप्त करुन ठेवली आहेत.

नुकसानीची जबाबदारी संशयितांवर

जातीय दंगल अथवा कोणत्याही स्वरुपाच्या आंदोलनामध्ये तोडफोड, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संशयितांवर निश्चित करण्यात येते. अशाचप्रकारे शुक्रवारी रात्री झालेल्या तोडफोडीतील नुकसानीची जबाबदारी संशयितांवर निश्चित करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#arrested#kolhapur News#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacomplaint registerLaxmipuri Police Stationpolice acsiddharth nagar kolhapur
Next Article