‘मॅक्स मिन अँड म्याऊजाकी’मध्ये सिद्धार्थ मेनन
काही चित्रपटांचे ट्रेलर पाहून याची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहताना मनाला भावणार याची कल्पना येत असते. असेच काहीसे ‘मॅक्स मिन अँड म्याऊजाकी’चा ट्रेलर पाहून जाणवते. या चित्रपटात अनेक दमदार कलाकार दिसून येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
ट्रेलरमध्ये मॅक्स अन् मिन नावाच्या एका युवा जोडप्याची कहाणी दाखविली जाते. त्यांचे नाते मॅक्सच्या जीवनातील एका अवघड काळात संपुष्टात येते. मॅक्सची भूमिका सिद्धार्थ मेननने साकारली आहे. सिद्धार्थ हा मराठी चित्रपटसृष्टीतील गुणवंत अभिनेता आहे. मनोभंग झाल्यावर त्याला ‘म्याऊजाकी’ नावाच्या पाळीव मांजराकडून अनपेक्षित दिलासा मिळतो. याचबरोबर मॅक्स आणि त्याच्या (आदिल हुसैन) पित्याच्या नात्यालाही दाखविण्यात आले असून जे अत्यंत वेगळ्या प्रकारचे आहे.
हा चित्रपट 24 जुले रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मेधा शंकर, सिद्धार्थ मेनन, आदिल हुसैन, मंदिरा बेदी, नफीसा अली यासारखे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन पद्मकुमार नरसिंहमूर्ती यांनी केले आहे. तसेच त्यांनीच याची कहाणी लिहिली आहे.