पुन्हा एकत्र झळकणार सिद्धार्थ-कियाराची जोडी
‘अदल बदल’ चित्रपटात रोमांस करताना दिसणार
सिद्धार्थ मल्होत्रा अन् कियारा अडवाणी दीर्घकाळापासून डेटिंगमुळे चर्चेत आहेत. ‘शेरशाह’पासून दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा जोरदार सुरू आहे. आता दोघेही मोठय़ा पडद्यावर एका प्रेमकथेत एकत्र काम करताना दिसून येणार आहेत.
‘शेरशाह’नंतर सिद्धार्थ अन् कियारा आता अनोखी प्रेमकथा असलेल्या ‘अदल बदल’मध्ये एकत्र दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती सुनील खेतरपाल करत आहेत. या चित्रपट ‘रोम-कॉम’ स्वरुपात तयार केला जाणार असून यात मोठय़ा प्रमाणावर व्हीएफएक्स अन् सीजीआयचा वापर होणार आहे. सिद्धार्थ अन् कियारा या चित्रपटासाठी अत्यंत उत्सुक आहेत.
सिद्धार्थ सध्या स्वतःची पदार्पणातील वेबसीरिज ‘इंडियन पोलीस फोर्स’च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या सीरिजचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहेत. याचबरोबर तो ‘मिशन मजनू’, ‘योद्धा’ आणि ‘थँक गॉड’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. तर कियारा ही रामचरणसोबत ‘आरसी 15’ चित्रपटात काम करत आहे. तसेच विक्की कौशल अन् भूमी पेडणेकरसोबत ती ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात दिसून येणार आहे.