For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नॉर्दम्पटनशी सिद्धार्थ कौल करारबद्ध

06:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
नॉर्दम्पटनशी सिद्धार्थ कौल करारबद्ध
Advertisement

वृत्तसंस्था /नॉर्दम्पटन

Advertisement

इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या नॉर्दम्पटनशायर क्रिकेट क्लबने भारताचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलबरोबर नुकताच नवा करार केला आहे. सदर माहिती नॉर्दम्पटन क्लबच्या व्यवस्थापकाने दिली आहे. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत नॉर्दम्पटनचा संघ सध्या मानांकनात पाचव्या स्थानावर आहे. या क्लबचे कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मधील आगामी होणाऱ्या तीन सामन्यांसाठी नॉर्दम्पटनशायरने पंजाबच्या 33 वर्षीय सिद्धार्थ कौलला करारबद्ध केले आहे. इंग्लिश डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सिद्धार्थ कौलचे या कराराने पदार्पण होत आहे. पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिद्धार्थ कौलने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 83 सामन्यात 26.45 धावांच्या सरासरीने 284 गडी बाद केले आहेत. त्यामध्ये त्याने 16 वेळा एका डावात 5 तर 13 वेळा एका डावात 4 गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये कौलने एका डावात 27 धावात 6 बळी ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.