For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धांतची कर्नाटक संघात निवड

10:06 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
सिद्धांतची कर्नाटक संघात निवड
Advertisement

बेळगाव : दावणगिरी येथे झालेल्या  राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत बेळगाव जिह्यासंघाने  स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले.   संत मीरा शाळेचा हँडबॉल खेळाडू सिद्धांत वर्माची 67 व्या राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे. दावणगिरी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने गुलबर्गाचा 18 -15 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बेळगांवने म्हैसूरचा 17-13 असा पराभव केला, तर अंतिम साखळी सामन्यात बेंगलोरने बेळगावचा 14-13असा अटीतटीच्या लढतीत पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत सिध्दांतने अंतिम लढतीत सर्वोत्कृष्ट गोलरक्षण करित उकृष्ट कामगिरी करीत कडवी झुंज देण्यात यश मिळवले. आता आगामी सुजयपूर मध्यप्रदेश येथे  होणाऱ्या 67 व्या शालेय राष्ट्रीय  हँडबॉल  स्पर्धेसाठी त्याची कर्नाटक राज्य हँडबॉल संघात निवड झाली आहे. बेळगावचे प्रतिनिधित्व करताना सिद्धांत वर्मा यांने  संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला. त्याला प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील, मयुरी पिंगट यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहान लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.