सिद्धांत कडालीची निवड
11:24 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/किणये
Advertisement
खादरवाडीचा मल्ल सिद्धांत कडालीने नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याने त्यांची 14 वर्षाखालील आणि 62 किलो वजन गटामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा 25 ते 30 डिसेंबर दरम्यान उझबेकिस्तान येथे होणार आहेत. सिध्दांतने अनेक ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये विविध पारितोषिके मिळविली आहेत. सिद्धांत हा मराठा मंडळ खादरवाडी शाळेचा विद्यार्थी असून तो इयत्ता सातवीत शिकत आहे. त्याला प्रशिक्षक अतुल शिराळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Advertisement
Advertisement