For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनोखा विक्रम : रूग्ण बासुरी वाजवत असतानाच केली शस्त्रक्रिया !

06:36 PM Sep 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
अनोखा विक्रम   रूग्ण बासुरी वाजवत असतानाच केली शस्त्रक्रिया
Siddhagiri Hospital Surgery
Advertisement

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या जटील 102 शस्त्रक्रिया

Advertisement

सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल 102 रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व जोखमीच्या समजल्या जाणाऱ्या अवेक फ्रेंनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असल्याची माहिती कणेरीमठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक, सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. एक रूग्ण बासुरी वाजवत असतानाच त्यांचे ऑपरेशन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

काडसिद्धश्वर स्वामी म्हणाले, “फंक्शनल एम.आर.आय., ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञान, न्युरो नेव्हीगेशन मशीन, न्युरो मॉनेटरिंग प्रणाली सह अनुभवी न्युरो शस्त्रक्रिया तज्ञ, अनुभवी न्युरो भूलतज्ञ यांच्या पूर्णतेतून यशस्वी व सर्वोत्तम अशी अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वी होवू शकते. यासर्व गोष्ठीसह सिद्धगिरी येथे कुशल डॉक्टर्स व नर्सिंग टीम सतत उपचारांसाठी उपलब्ध असल्यामुळेच ग्रामीण भागात असून ही सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने 102 अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला आहे. आता अशा आरोग्य सेवांकरिता मेट्रो सिटीमध्ये जाण्याची आता आवश्यकता नाही, कारण मेट्रो सिटीमध्ये अशा उपकरणांसह शस्त्रक्रिया मोजक्याच प्रमाणात होतात. या प्रकारच्या शस्त्रक्रियेत शस्त्रक्रिया करताना रुग्ण बोलू शकतो, हात-पाय हालवू शकतो. कधी कधी तर रुग्ण काही प्रकारची वाद्य ही वाजवू शकतो. अशा वातावरणात शस्त्रक्रिया करण्याचे कसब व कौशल्य डॉ. शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमकडे आहे म्हणून हा विक्रम केला आहे. तसेच मेंदूवरील ज्या शस्त्रक्रियेसाठी 10 ते 12 लाख खर्च येतो. सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हीच शस्त्रक्रिया दीड लाखांत केली जाते.

Advertisement

डॉ. मरजक्के म्हणाले, सिद्धीगिरी हॉस्पिटलमध्ये जटील आणि जोखमीच्या 102 मोंदूच्या शस्त्रक्रिया केला आहेत. यामध्ये एक रूग्ण बासूरी वाजवत असतानाच अॅपरेशन केले. ज्या रुग्णांच्या मेंदूतील संवेदनशील अशा भाषेच्या अथवा नियंत्रण भागात जर गाट असेल तर रुग्णाची बोलण्याची अथवा नियंत्रक शक्ती नष्ट होवू शकते. अशा वेळी रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास जागे ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जागा असणाऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे ही जोखमीची गोष्ट असली तरी रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असते. या रुग्णाच्या बाबतीत रुग्णाची बासुरी वाजवण्याची क्षमता नष्ट होऊ नये, यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या टीमने रुग्णास बासुरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेची भूल देणे व इतर शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यात महत्वाचा फरक असतो. इतर शस्त्रक्रियेत भूल दिल्यावर रुग्णास कोणत्याच संवेदना होत नाहीत, तो पूर्णपणे बेशुद्ध असतो. पण अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेमध्ये भूल देताना केवळ मेंदूच्या प्रमुख भागात भूल देवून केवळ तोच भाग भूलीत केला जातो. अशा शस्त्रक्रियेत रुग्णास बोलते ठेवून, आरामदायक स्थिती शस्त्रक्रिया संपेपर्यंत ठेवावी लागते, हे कौशल्य व कसब केवळ न्युरो भूलतज्ञांकडे असते, सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश भरमगौडर ही जबबदारी गेली 10 वर्ष यशस्वी सांभाळत असल्याचेही डॉ. मरजक्के यांनी सांगितले. यावेळी न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, ऋतुराज भोसले, दयानंद डोंगरे उपस्थित होते.

अधुनिक तंत्रज्ञासह सिद्धगिरी हॉस्पिटल सज्ज
अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करत असताना रुग्णासोबत बोलत बोलत शस्त्रक्रिया करावी लागते. अनेकवेळा रुग्ण घाबरण्याची शक्यता अधिक असते तर रुग्णाची हालचाल होण्याची शक्यता ही अधिक असते. अशा वेळी रुग्णाच्या मेंदूतील इतर भागाला इजा होऊ शकते, त्यामुळे अशी जोखमीची शस्त्रक्रिया करणे यासाठी अद्यावत तंत्रज्ञान व कुशल टीम आवश्यक आहे. यासाठी लागणारे तंत्रज्ञान व टीम सिद्धगिरी हॉस्पिटल येथे उपलब्ध असल्याचे डॉ. मरजक्के यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.