सिध्देश परब यांची महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव पदी नियुक्ती
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली निवड
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती यांनी सिद्धेश विजय परब यांनी युवक काँग्रेसच्या संघटनावाढीमध्ये दिलेल्या मोठ्या योगदानाची दखल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्यांदाच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारीणीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांची नियुक्ती करण्यात आली. त्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी सिद्धेश परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करताना सिद्धेश उर्फ भाई परब यांनी युवक संघटना मजबुतीसाठी विशेष परिश्रम घेतले तसेच त्यांनी या अगोदर सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष म्हणून काम करताना युवक काँग्रेसच्या संघटनावाढीमध्ये सिद्धेश परब यांचे योगदान मोठे असल्यामुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी आपल्या कमिटीवर सिंधुदुर्गातून प्रथमच सिद्धेश परब यांचे सचिव पदी नेमणूक केली.
कुडाळ एम.आय.डी.सी. येथे बुधवारी आयोजित केलेल्या जिल्हा राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी जयदीप थोरात व सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्यावतीने सिद्धेश परब यांची युवक प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष नगरसेवक नितिन बागे, कणकवली युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत दहिबांवकर, देवगड युवक काँग्रेस दीपक पाडवे, वेंगुर्ला तालुका कार्यकारणी सदस्य आनंद गोडकर, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री मंदार शिरसाट व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.