For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्या यांनी घेतला आगामी निवडणूक न लढविण्याचा निर्णय !

03:45 PM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्या यांनी घेतला आगामी निवडणूक न लढविण्याचा निर्णय
Advertisement

1978 मध्ये राजकारणात प्रवेश केलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वीही निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीबाबत अशीच विधाने केली आहेत.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले की, वाढत्या वय आणि प्रकृतीची स्थिती लक्षात घेऊन भविष्यात मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. सिद्धरामय्या म्हैसूरमध्ये मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देत होते वरुणा विधानसभा क्षेत्रातील त्यांच्या मतदारसंघातील त्यांनी पुन्हा आमदार निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. “मी 77 वर्षांचा आहे. अजून चार वर्षांचा कालावधी आहे (मुख्यमंत्री आणि आमदार म्हणून). जेव्हा माझा कार्यकाळ संपेल, तेव्हा मी 81 किंवा 82 वर्षांचा होईन... माझी तब्येत राहणार नाही आणि मी उत्साहाने काम करू शकत नाही,” सिद्धरामय्या म्हणाले. आपण 1978 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता, असे नमूद करून सिद्धरामय्या म्हणाले की, निवृत्त झाल्यावर त्यांना निवडणुकीच्या राजकारणात 50 वर्षे पूर्ण झाली असतील. सिद्धरामय्या यांनी यापूर्वीही अशीच विधाने केली आहेत. 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेस नेत्याने पत्रकारांना सांगितले होते की, ही त्यांची शेवटची निवडणूक होती. 2018 मध्ये त्यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली होती. 2023 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर म्हैसूरजवळ आयोजित सभेत सिद्धरामय्या म्हणाले होते की ते राजकारणात सक्रिय असले तरी ते यापुढे निवडणूक लढवणार नाहीत.

Advertisement

Advertisement
Tags :

.