For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्यांची काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती

06:33 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्यांची काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

Advertisement

बेंगळूरमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असतानाच इकडे काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सिद्धरामय्या यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीवर (सीडब्ल्यूसी) सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशावरून काँग्रेसचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या त्याग केलेल्या सिद्धरामय्यांना हायकमांडने राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर दिली होती. मात्र, सिद्धरामय्यांनी ती नाकारली. त्यामुळे त्यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांची काँग्रेस हायकमांडने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे.

Advertisement

राज्यात नवीन सरकारचे मंत्रिमंडळ अस्तित्वात येत असतानाच सिद्धरामय्या यांची एका उच्चस्तयीर राष्ट्रीय समितीवर नियुक्ती झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. हायकमांड स्तरावर त्यांच्या ज्येष्ठतेची ही एक मोठी पोचपावती म्हणून याकडे पाहिले जात आहे.

Advertisement
Tags :

.