लातूरात कोयत्याने वार; आई, वडील, मुलासह तिघे जखमी
05:46 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
एकाने कोयता तर इतरांनी काठी, दगडाने केली मारहाण
लातूर : शहरातील वसवाडी येथील भाजीपाला बाजारात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एकाने कोयता तर इतरांनी काठी, दगडाने मारहाण करून एक तरुण व त्याच्या आई, वडिलांस जखमी केले. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१९ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात केलेली तक्रार काढून का घेत नाहीस म्हणून सोहेल मोईन शेख (वय २८), मोमीन आमीनसाब शेख (वय ५५), आई तनवीर मोईन शेख (वय ४५) यांना टोळक्याने कोयता घेऊन पाठलाग करून तिघांना मारहाण केली.
जखमी फिर्यादी हा याच भागात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करित असल्याचे वृत्त आहे. अजय जमदाडे, आशिष रेड्डी, तुषार भंडगे, सुशांत जाधव, प्रतिक गायकवाड, केदार खुळे, संकेत लगाडे, आदर्श वाघमारे, कृष्णा सगर आदीविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.