For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजारी बसचालकाला ड्युटीवर पाठवले ; सावंतवाडी आगाराच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार

11:57 AM Jan 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आजारी बसचालकाला ड्युटीवर पाठवले   सावंतवाडी आगाराच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार
Advertisement

कोल्हापूर | प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी स्थानकातून 15 जानेवारी रोजी सकाळी सुटणारी सावंतवाडी - पुणे एसटी बस तब्बल दोन तास उशिरा धावली होती. ही एसटी बस हाती घेण्यास चालक राजी नव्हता. सदर चालक हा आजारी असल्यामुळे आपण लांब पल्ल्याची एसटी बस हाकू शकत नाही असा निर्वाळा त्याने दिला होता. असे असतानाही सावंतवाडी एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांनी सदर चालकाला सक्तीने सावंतवाडी - पुणे एसटी बस हाकण्यास सांगितले. पण , कोल्हापूर बस स्थानकात ही बस येताच सदर चालक श्री मुळीक याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तात्काळ कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ताण-तणावाखाली असल्यामुळेच त्याला अस्वस्थ वाटू लागले आहे .त्याला चार दिवस रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे. खरेतर सावंतवाडी स्थानकातून ही बस सुटतानाच सदर चालकाने आपल्याला बस चालवणे शक्य नाही असे सांगूनही अधिकारी वर्गाने त्याच्यावर दबाव टाकून त्याला एसटी बस हाकायला लावली. चालकाकडून एसटीचे स्टेअरिंग हातात घेण्यापूर्वी त्याच्याकडून लेखी लिहूनही घेतले होते. त्यावेळी त्याने आपण बरे नसल्याने ड्युटी करत नाही असे स्पष्ट केले होते. लेखी खुलासा चालकाने देऊन सुद्धा एसटी स्थानकातील अधिकाऱ्यांनी प्रवाशांचा जीव धोक्यात घालून त्याला कसे काय ड्युटीवर पाठवले ? असा सवाल आता व्यक्त होत आहे. या बस मध्ये जवळपास 35 ते 40 प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने कोल्हापूर स्थानकातच सदर चालकाला अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्याला वाटेत कुठे असे झाले असते तर मोठा अनर्थ घडला असता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.