For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मिमिक्री’फेम श्याम रंगीला नरेंद्र मोदींविरोधात लढणार

06:17 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘मिमिक्री’फेम श्याम रंगीला नरेंद्र मोदींविरोधात लढणार
Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची नक्कल करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला राजस्थानचा कॉमेडियन श्याम रंगीला याने मोठी घोषणा केली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे त्याने नुकतेच सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. श्याम रंगीला याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर सुऊवातीला बऱ्याच जणांना तो विनोदच वाटला. मात्र, बुधवारी श्याम रंगीला यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना आपण मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसांत तो वाराणसीला जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

लोकशाही वाचवण्यासाठी आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे श्याम रंगीला याने सांगितले. “लोकशाही धोक्मयात येऊ नये म्हणून मी निवडणूक लढवत आहे. येथे लोकांना मतदानाचा पर्याय मिळेल. सुरत आणि इंदूरसारखी परिस्थिती नसेल. सुरत आणि इंदूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने भाजपचा विजय निश्चित झाला आहे. याच कारणामुळे श्याम रंगीला निवडणूक लढवणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.