For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्वेता त्रिपाठी करणार चित्रपटनिर्मिती

06:17 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्वेता त्रिपाठी करणार चित्रपटनिर्मिती
Advertisement

दोन महिलांची प्रेमकहाणी सादर करणार

Advertisement

मिर्झापूर फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठी अभिनयानंतर आता निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. श्वेताच्या प्रॉडक्शन हाउसकडून दोन महिलांमधील प्रेमहाणीवर आधारित चित्रपट सादर केला जाणार आहे. श्वेताच्या प्रॉडक्शन हाउसकडून निर्माण होणारा चित्रपट एलजीबीटीक्यूआयए प्लसवर आधारित आहे. जेव्हा एक कलाकार म्हणून ही पटकथा माझ्याकडे आली तेव्हा मी त्वरित याची संवेदनशीलता आणि त्यातील प्रेमाची मांडणी पाहून आकर्षित झाले. ही कहाणी योग्यप्रकारे मांडणे महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव मला झाली. यानंतरच मी निर्माती म्हणून यात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे श्वेता त्रिपाठीने सांगितले आहे.

हा केवळ एक चित्रपट नसून प्रेम, ओळख आणि स्वत:च्य असण्याचा साहसाचा उत्सव आहे. एक निर्माती म्हणून आता माझ्याकडे कहाण्याची रचनात्मक स्वातंत्र्य आहे आणि मी याहून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करू शकत नव्हते असे श्वेताने सांगितले आहे. याचबरोबर श्वेताच्या प्रॉडक्शन हाउसकडून एक भयपट, एक ड्रामा आणि सायकोलॉजिकल थ्रिलरपट निर्माण केला जाणार आहे.

Advertisement

याचबरोबर श्वेताकडून लहान मुलांसाठी चित्रपट निर्माण केला जाणार आहे.  आम्ही जे चित्रपट पाहत लहानाचे मोठे होतो, ते आम्हाला घडविण्यास भूमिका बजावत असतात.  मुलांच्या मनावर एक स्थायी प्रभाव पाडणाऱ्या कहाण्यांची निवड करणार असल्याचे श्वेताने म्हटले आहे

Advertisement
Tags :

.