For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पलकों पे’ चित्रपटात श्वेता त्रिपाठी

07:00 AM Feb 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पलकों पे’ चित्रपटात श्वेता त्रिपाठी
Advertisement

‘मिर्झापूर’ सीरिजद्वारे देशभरात ओळख निर्माण केलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. अलिकडेच तिने ‘मिर्झापूर : द फिल्म’चे मुंबईतील चित्रिकरण पूर्ण केले आहे. आता ती स्वत:चा पुढील चित्रपट ‘पलकों पे’च्या चित्रिकरणात सामील झाली आहे. या चित्रपटात अभिनेता राहुल मित्रा हा श्वेताच्या पित्याची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. पूर्ण चित्रपटाचे चित्रिकरण लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या श्वेता त्रिपाठी, राहुल मित्रा, अभिषेक चौहान आणि ईशान नकवी समवेत सर्व कलाकार भोपाळमध्ये असून तेथे अनेक लोकेशन्सवर सातत्याने चित्रिकरण सुरू आहे.

Advertisement

राहुल मित्रा अलिकडेच यामी गौतम आणि इम्रान हाश्मीसोबत ‘हक’ या चित्रपटात दिसून आला आहे. ‘पलकों पे’ चित्रपटात तो संवेदनशील पित्याची भूमिका साकारत असून याचे दिग्दर्शन निद्धिश पूझक्कल करत आहे. हा एक सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट आहे. ज्यात घटस्फोट लैंगिक समानता आणि मानसिक आरोग्य या मुद्द्यांना मध्यवर्ती स्थानी ठेवण्यात आले आहे. चित्रपट या विषयांना मानवी संवेदना आणि नात्यांद्वारे समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. चित्रपटाची निर्मिती टॅम्बू एंटरटेनमेंट आणि सलीम जावेद यांच्या जरिया एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. हा चित्रपट चालूवर्षातच प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.