‘असुर 3’मध्ये श्वेता प्रसाद बासू
अरशद वारसी मुख्य भूमिकेत
‘असुर’ ही गौरव शुक्लाकडून निर्मित एक अत्यंत यशस्वी अन् रंजक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. याच्या दोन सीझन्सना जबरदस्त यश मिळाल्यावर निर्माते आता तिसऱ्या सीझनच्या तयारीत आहेत. धनंजय राजपूत अन् निखिल या व्यक्तिरेखा या फ्रेंचाइजीच्या महत्त्वपूर्ण हिस्सा आहेत. आता यात रोमांच जोडण्यासाठी अभिनेक्षी श्वेता प्रसाद बासू तिसऱ्या सीझनमध्ये सामील होणार आहे.
‘असुर 3’चे चित्रिकरण सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. वेबसीरिजच्या तिसऱ्या भागात अरशद वारसी अन् वरुण सोबतीच मुख्य भूमिकेत असतील. सीझन 3च्या दिग्दर्शनाची सुरुवात गौरव शुक्ला करणार आहे. तर मागील दोन सीझन्सचे दिग्दर्शन ओनी सेनने केले होते, तर शुक्ला हे लेखक अन् क्रिएटरच्या भूमिकेत होते. गौरव शुक्ला यावेळी निर्मात्याच्या भूमिकेत देखील असणार आहे.
‘असुर’ ही भारतीय सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज असून त्यात सीबीआयचे फॉरेन्सिक एक्सपर्ट निखिल नायर आणि त्यांचे जुने मार्गदर्शक धनंजय डीजे राजपूत यांची कहाणी दाखविण्यात आली आहे. हे दोघेही एका क्रूर सीरियल किलरचा पाठलाग करत असतात. सीरियल किलरची मानसिकता फॉरेन्सिक सायन्सला प्राचीन भारतीय कथांशी जोडणारी असते. ज्यात ते याचा एक हेतू एक नवा परंतु काळा अध्याय सुरू करणे असल्याचे शोधून काढतात. ही सीरिज हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.