For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्वेताला मिळाला मोठा ब्रेक

06:47 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्वेताला मिळाला मोठा ब्रेक
Advertisement

टीव्ही मालिकांमधून गाजलेली अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडिया स्टार आहे. चालू वर्षात ती रोहित शेट्टीची सीरिज इंडियन पुलिस फोर्समध्ये दिसून आली. यानंतर ती सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगणसोबत दिसून येणार आहे. 24 वर्षांच्या कारकीर्दीत श्वेता पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

Advertisement

43 वर्षीय अभिनेत्री स्वत:च्या अदांद्वारे चाहत्यांना घायाळ करत असते.  श्वेता आता करण जौहरच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या वेबसीरिजसाठी माझी निवड झाली आहे. यात मी एका महिला डॉनची भूमिका साकारत आहे. ही एक अत्यंत आव्हानात्मक भूमिका असल्याचे श्वेताने सांगितले आहे.

कुठल्याही दिग्दर्शक किंवा अभिनेत्यासोबत मला काम करायचे असल्यास छोट्या भूमिका स्वीकाराव्या लागतील याची मला जाणीव आहे. मी दर 5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वत:ची सुरुवात करू इच्छिते असेही तिने म्हटले आहे. श्वेताची मुलगी पलक देखील सध्या बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.