कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'जिवन शिक्षण' मध्ये शुभांगी लोकरे-खोत यांचा लेख प्रकाशित

05:43 PM May 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र असलेल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत प्रकाशित होणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण अश्या 'जीवन शिक्षण' या मासिकात जिल्हा परिषद शाळा चिंदर सडेवाडी, मालवण येथे कार्यरत असणाऱ्या नवनियुक्त शिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत यांचा 'परिवर्तनशील अध्ययन निष्पती : एनसीएफ 2020 चा शालेय शिक्षणावरील परिणाम' हा लेख इंग्लिश भाषेतील लेख प्रकाशित झाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट् पुणे-३० यांच्या मार्फत जीवन शिक्षण हे मासिक प्रकाशित केले जाते, या मासिकाला १६० पेक्षा अधिक वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावणारे हे मासिक शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. जीवन शिक्षण" हे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे मासिक आहे. त्यात शिक्षिका शुभांगी लोकर-खोत यांचा प्रसिद्ध झालेला लेख निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.प्रकाशित झालेल्या लेखातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील शालेय अभ्यासक्रमात महत्वाची भूमिका बजावतात त्या अध्ययन निष्पतीआणि याच अध्ययन निष्पतीची माहिती देणारा परिवर्तनशील अध्ययन निष्पती : एनसीएफ 2020 चा शालेय शिक्षणावरील परिणाम हा लेख Transforming Lo's (Learning Outcomes ):The impact of NCF 2020 on School Education या मथळ्याखाली इंग्लिश मध्ये प्रकाशित झाला आहे. भारताच्या शालेय शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2020 (एनसीएफ 2020) पुढे येत आहे. या दृष्टीकोन आणि दूरगामी धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पारंपरिक शिक्षणपद्धतींपासून दूर जात, एनसीएफ 2020 मध्ये क्षमता-आधारित शिक्षण व मूल्यांकन प्रणालीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे केवळ वयोमानाच्या आधारावर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतांनुसार त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. यामुळे शिक्षणात गुणवत्तात्मक सुधारणा होण्याची शक्यता आहे.आराखड्याचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे समानता व समावेशकतेला दिलेले प्राधान्य. विद्यार्थ्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी काहीही असली तरी, प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी एनसीएफ 2020 प्रयत्नशील आहे. पालक, शिक्षक आणि समाज यांचा सक्रिय सहभाग शिक्षण प्रक्रियेतून मिळावा, यासाठी या चौकटीत विविध मार्ग सुचवण्यात आले आहेत.शिक्षकांच्या भूमिकेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे. प्रशिक्षित आणि कुशल शिक्षकवर्गाची निर्मिती, तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या धोरणांचा अंतर्भाव शिक्षणाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा घडवून आणेल. यातून विद्यार्थ्यांचे शिकण्याचे परिणामही अधिक प्रभावी होतील. एनसीएफ 2020 ही शिक्षणक्षेत्रातील एक क्रांतिकारी चौकट ठरू शकते. नवोन्मेष, लवचिकता आणि प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या या धोरणामुळे वर्गखोलीत नव्या पद्धती स्वीकारल्या जातील. यामुळे शिकण्याच्या प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण, सहभागी आणि आनंददायी ठरेल. एकंदरीत, एनसीएफ 2020 भारतातील शिक्षणात दीर्घकालीन सुधारणा घडवू शकणारी दिशा आहे. तिच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे केवळ शैक्षणिक पातळीवर नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचाही पाया घातला जाऊ शकतो. शिक्षणाच्या माध्यमातून एक अधिक न्याय्य, समावेशक आणि समृद्ध समाज घडवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एनसीएफ 2020 एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे. असे शुभांगी लोकरे खोत यांनी सांगितले. अशा आशयाचे लेखन सौ. शुभांगी लोकरे खोत यांच्या प्रकाशित लेखात करण्यात आले आहे. अशा प्रकारचे संशोधनात्मक लेखन करणे आणि त्याची महाराष्ट्र शासनाच्या मासिकातुन विशेष दखल घेतली जाणे ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. जिल्हापरिषद शाळा चिंदर सडेवाडी प्रशालेत कार्यरत असलेल्या शुभांगी खोत यांनी यापूर्वी सीबीएसई स्कुल मध्ये प्रिंसिपल पदाची जबाबदारी ही यशस्वी पार पाडली आहे. तसेच इंग्लिश कम्युनिकेशन यात त्या पीएचडी करत आहेत. असे सांगत प्राधापक नागेश कदम तसेच अनेक शिक्षकांकडून शुभांगी लोकरे-खोत यांचे विशेष कौतुक करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा डायट चे प्राचार्य राजेंद्र कांबळे सर, गटशिक्षणाधिकारी संजय माने सर, विस्तार अधिकारी उदय दिक्षित सर, प्रा. नागेश कदम सर, यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले असे शुभांगी लोकरे-खोत यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # malvan #
Next Article