For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकरवाडी उपसरपंचपदी शुभदा गोसावी यांची बिनविरोध निवड

12:29 PM Jan 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पालकरवाडी उपसरपंचपदी शुभदा गोसावी यांची बिनविरोध निवड
Advertisement

वेंगुर्ले । प्रतिनिधी

Advertisement

वेतोरे - पालकरवाडी गावच्या उपसरपंचपदी शुभदा समीर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सोमवारी दुपारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या खास बैठकीत शुभदा गोसावी यांची खास निवड करण्यात आली . यावेळी शुभदा गोसावी यांनी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले . गावाच्या विकासासाठी सर्वानी एकमताने काम करूया ,असेच पुढे सहकार्य करा असे आवाहन केले . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी विजय सावंत यांनी काम पाहिले .पालकरवाडी उपसरपंच नंदिनी शेर्लेकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, सामाजिक कार्यकर्ते सूर्याजी नाईक, तालुका खरेदी _विक्री संघाचे माजी संचालक अनिल गोसावी, पोलीस पाटील समीर गोसावी, बंटी गोसावी, आकाश गोसावी, हर्षाली गोसावी, माजी उपसरपंच उमा करंगुटकर, दिनकर पालव, यशवंत कापडी, नंदिनी शेर्लेकर, दर्शना पालकर, संगीता परब, दीपक मोहिते, विकास अणसुरकर, नारायण गावडे, सातेरी सोसायटी संचालक नारायण शेर्लेकर, आबा येरम, ग्रामपंचायत माजी सदस्य सुधीर गावडे, ज्ञानेश्वर लटम, बाळा गावडे, रामचंद्र कोळकर, दीपक करंगुटकर, सुरेश गोसावी, रामचंद्र गोसावी, ओंकार गोसावी, दयानंद परब, आकाश परब, योगेश परब ,सुहास नाईक, महादेव गावडे, सुप्रिया गोसावी आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिला व ग्रामस्थांनी शुभदा गोसावी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.