For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शास्त्रोक्त गायन स्पर्धेत श्रुती सावंत प्रथम

05:04 PM Jul 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शास्त्रोक्त गायन स्पर्धेत श्रुती सावंत प्रथम
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

गोवा साखळी येथे रविवारी ६ जुलै रोजी झालेल्या सम्राट संगीत सितारा २०२५ या शास्त्रोक्त गायन स्पर्धेच्या १९ व्या पर्वाच्या अंतिम फेरीत कुडाळ येथील श्रुती शरद सावंत ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. या स्पर्धेच्या या अंतिम फेरीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या या अंतिम फेरीचे परीक्षण विदुषी अल्का देव मारुलकर यांनी केले. सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी सावंतवाडी येथे झाली होती. त्यानंतर गोवा कुडचडे येथे झालेल्या या स्पर्धेच्या पुढील फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ६ स्पर्धकांमध्ये श्रुती सावंत हिचा समावेश होता. श्रुती सावंत सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारच्या संचालिका सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) यांच्याकडे शास्त्रोक्त गायन शिकत असून कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्रामध्ये पं. डॉ. समीर दुबळे (पुणे) यांच्याकडे शास्त्रोक्त गायनाचे पुढील शिक्षण घेत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.