राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत श्रुती राठीची निवड
10:31 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : भोपाळ सॅम ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे झालेल्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला बुद्धिबळ स्पर्धेत नाशिक येथील मोतीवाला कॉलेज अॅाफ फिजीओथेरेपीच्या चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी श्रुती अरविंद राठीने चतुर्थ पारितोषिक मिळवित यश संपादन केले. वेस्ट झोन स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 50 विद्यापीठांतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. श्रुती राठीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रतिनिधी म्हणून सहभागी झाली. सदर यशाबद्दल श्रुती हिचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, मोतीवाला कॉलेज अॅाफ फिजीओथेरेपीचे प्राचार्य वैभव महाजन, संचालक फराज मोतीवाला आदींनी अभिनंदन केले. यशामुळे श्रुतीला नवी दिल्लीत होणाऱ्या अॅाल इंडिया झोनल इंटर युनिव्हर्सिटी महिला बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाला आहे.
Advertisement
Advertisement