विवाहाच्या अफवेमुळे श्रुती त्रस्त
मागील काही दिवसांपासून अभिनेत्री श्रुती हासनने प्रियकर शंतनू हजारिकासोबत विवाह केल्याची अफवा पसरली आहे. आता या अफवेवरील चर्चेदरम्यान श्रुती आणि तिच्या प्रियकराने स्पष्टीकरण दिले आहे. आणि अफवा फैलावणाऱ्या लोकांना विशेष विनंती केली आहे. माझा विवाह झालेला नाही. आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत अगदी मोकळपणाने बोलणारी माझ्यासारखी व्यक्ती विवाहाची गोष्ट कशी लपवेल? जे मला अजिबात ओळखत नाहीत त्यांनी शांत रहावे असे श्रुतीने म्हटले आहे. तुम्ही सर्वांनी शांत राहण्याची गरज आहे. आमचा विवाह झालेला नाही. जे लोक आम्हाला ओळखत नाहीत, त्यांनी कृपया अफवा पसवू नये असे शंतनूने सोशल मीडियावर नमूद केले आहे. ओरी उर्फ ओरहान अवतारमणीने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये भाग घेतला होता. यावेळी एका चाहत्याने ओरीला तुझ्यासोबत छायाचित्रे काढून घेण्यास नकार दिलेल्या किंवा उद्धटपणे वागलेल्या सेलिब्रिटीबद्दल विचारले होते. यावर बोलताना ओरीने श्रुतीचे नाव घेतले होते. मी कधीच तिच्यासोबत छायाचित्रे काढून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही एका कार्यक्रमात भेटलो, जिथे ती माझ्यासोबत उद्धटपणे वागत होती. मी तिला ओळखत नसलो तरी तिच्या पतीला ओळखतो असे ओरीने म्हटले होते.