महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘डेकोइट’मध्ये श्रुती हासन अन् अदिवि

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रेक्षकांना दरोडेखोरांच्या जीवनाची झलक दिसणार

Advertisement

तेलगू अभिनेता अदिवि शेषने मागील वर्षी ‘मेजर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट 26/11 हल्ल्यादरम्यान हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित होता. अदिवि याचा पुढील चित्रपट ‘डेकोइट’ असून तो हिंदी आणि तेलगू दोन्ही भाषेत तयार केला जाणार आहे. यात त्याची नायिका श्रुती हासन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर अणि टीझर सादर करण्यात आला आहे. हा चित्रपट दरोडेखोरांचे जग कसे असते याची झलक दाखविणार आहे. अन्नपूर्णा स्टुडिओकडून निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन शेनिल देव यांच्याकडून केले जाणार आहे. स्वत:चे जीवन बदलण्यासाठी दरोडे घालण्याकरता एकत्र आलेल्या दोन जणांची ही कहाणी आहे. अदिवि आणि देव यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. डेकोइट हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत निर्माण करत आहोत. हा केवळ अॅक्शन ड्रामा नसून यात मनाला भिडतील असे प्रसंग चित्रित करण्यात येणार असल्याचे अदिविने सांगितले आहे. चित्रपटाची कहाणी संताप, निर्धार आणि लालित्याने भरपूर आहे. चित्रपटात सहभागी होण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारी महिन्यात सुरू होणार असल्याचे श्रुतीने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article