For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्व. श्रीपतराव शिंदेंचे पुतणे अजित शिंदे यांचा मंडलिकांना पाठिंबा

02:56 PM Apr 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
स्व  श्रीपतराव शिंदेंचे पुतणे अजित शिंदे यांचा मंडलिकांना पाठिंबा
Advertisement

खा.संजय मंडलिक यांनी विविध विकास कामे करीत जनसामान्यांत विकास कामे पोहचवली आहेत. जनसामान्यांच्या प्रती सदैव तत्पर असण्राया आणि विकासाचे व्हिजन घेऊन जाण्राया नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मंडलिकांच्या विजयासाठी प्रयत्न करू. अशी ग्वाही स्व. श्रीपतराव शिंदे यांचे पुतणे माजी उपसरपंच अजित शिंदे यांनी दिली.
लोकशाहीत पॅलेस पॉलीटीक्स कशाला...?
या निवडणुकीत विरोधक विकासकामाचे व्हिजन न घेता मान अपमान यामध्ये रममाण झाले असून पॅलेस पॉलीटीक्सचे नवे चित्र उभे केले जात आहे. या निवडणुकीत जनता राजेशाहीपेक्षा लोकशाहीला महत्त्व देईल असा विश्वास प्रा.संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
राज्यघराण्यांचा राजकीय हत्यार म्हणून वापर
कोल्हापूर जिह्यातील जनतेला राज्यघराण्याप्रती अपार श्रद्धा आहे. परंतु काही अति महत्वाकांक्षी नेते केवळ राजकीय स्वार्थापोटी या राजघराण्याचा हत्यार म्हणून वापर करीत आहेत.असा घणाघात राष्ट्रवादीचे जयसिंग चव्हाण केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.