कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सव 8 पासून

06:26 AM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/ सांबरा

Advertisement

कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 120 व्या पुण्यतिथी उत्सवाला बुधवार दि. 8 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून श्री दत्त संस्थानच्यावतीने उत्सवाची जय्यत तयारी चालविण्यात आली आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

सध्या मंदिर व आमराई परिसरामध्ये स्वच्छता व रंगकाम हाती घेण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. भक्तांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये हजारो भाविकांची उपस्थिती असते. भक्तांना सर्व सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने श्री दत्त संस्थानच्यावतीने सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे.

बुधवार दि. 8 रोजी सकाळी 8 वा. श्री पंतवाडा, समादेवी गल्ली, बेळगाव येथून प्रेमध्वज मिरवणूक निघेल. बेळगाव शहरातून मार्गक्रमण करत सांबरामार्गे प्रेमध्वज मिरवणूक दुपारी 2 पर्यंत श्री पंत बाळेकुंद्री येथील वाड्यामध्ये पोहोचेल. सायंकाळी 5 वाजता श्रीपंत वाडा येथून प्रेमध्वज मिरवणूक निघेल व रात्री 8 वाजता प्रेम ध्वजारोहण होऊन उत्सवाला सुरुवात होईल.

गुरुवार दि. 9 रोजी पहाटे 5 वाजता श्रींचा पुण्यस्मरण कार्यक्रम होईल. सकाळी 7 वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघून 2 प्रहरी आमराईतील श्रीपंतस्थानी येईल व रात्री 8 ते 12 या वेळेत पालखी सेवा होईल.

यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 10 रोजी दुपारी 12 वाजता श्रींचा महाप्रसाद होईल. दुपारी 3 ते 5 या वेळेत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचेल व उत्सवाची सांगता होईल. तरी भक्तांनी पुण्यतिथी उत्सवाचा लाभ घ्यावा, असे श्रीदत्त संस्थानच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article