For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिजगर्णीत युवा क्रीडापटू श्रीनाथ निलजकर, निवृत्त जवान बजरंग पाटील यांचा सत्कार

01:29 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिजगर्णीत युवा क्रीडापटू श्रीनाथ निलजकर  निवृत्त जवान बजरंग पाटील यांचा सत्कार
Advertisement

बेळगाव : बिजगर्णी येथील तिरंगा युवक मंडळाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा युवा क्रीडापटू श्रीनाथ चंद्रकांत निलजकर तसेच भारतीय सैन्यात 20 वर्षे सेवा बजावून नुकतेच निवृत्त झालेले जवान बजरंग नागोजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

बिजगर्णी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या श्रीनाथ निलजकर याने नेहरू क्रीडा मैदानावर शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित ग्रामीण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 17 वर्षांखालील वैयक्तिक गोळाफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मिळवलेल्या श्रीनाथच्या यशाबद्दल तिरंगा युवक मंडळाच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे, यासाठी गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Advertisement

याच कार्यक्रमात बेळगुंदी येथील जवान बजरंग नागोजी पाटील यांनी भारतीय सैन्यात 20 वर्षे सेवा बजावत देशसेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष महादेव बंडू भाष्कळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्रीनाथ निलजकर आणि बजरंग पाटील यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी के. आर. भाष्कळ, सचिन जाधव, विनायक भाष्कळ, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे आदी उपस्थित होते.

श्रीनाथ निलजकरच्या क्रीडा यशाबद्दल तसेच बजरंग पाटील यांच्या देशसेवेबद्दल यल्लाप्पा बेळगावकर, पिंट्टू निलजकर, मनोहर पाटील, मारुती जाधव, कल्लाप्पा अष्टेकर, कृष्णा जाधव, विनोद जाधव, परशराम बेर्डे, मोहन सावी, शंकर मोरे, सागर नाईक, सूर्याजी भाष्कळ, आप्पाजी मोरे, विजय भाष्कळ यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. श्रीनाथने जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्तम कामगिरी करावी, तसेच बजरंग पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.