शहापूरमध्ये श्रीनाथ कँटीन अँड केटरर्सची तिसरी शाखा सुरू
अस्सल चवीचा नवा ठेवा खाद्यप्रेमींसाठी खुला
त.भा. प्रतिनिधी
बेळगाव : शहरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या श्रीनाथ कॅन्टीन अँड पॅटरर्सने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मैलाचा दगड गाठत शहापूर येथील शिवाजी गार्डनसमोर तिसरी शाखा सुरू केली आहे. अस्सल चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि स्वच्छतेचा संगम असलेल्या या नव्या शाखेला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यापूर्वी कडोलकर गल्ली आणि प्रकाश टॉकीजसमोरील शाखांमधून ग्राहकांची मने जिंकणाऱ्या श्रीनाथ पॅन्टीनने आता शहापूर परिसरातील नागरिकांसाठीही ऊचकर आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. या शाखेत पावभाजी, भजी, पुरीभाजी, शेवपुरी, पाणीपुरी यासारखे ताजे, स्वादिष्ट आणि दर्जेदार पदार्थ उपलब्ध असून, प्रत्येक पदार्थांत अस्सल चव आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय लग्न समारंभ, वाढदिवस, गृहप्रवेश, धार्मिक कार्यक्रम, कॉर्पोरेट कार्यक्रम तसेच इतर विविध समारंभांसाठी पॅटरिंगच्या ऑर्डरही स्वीकारल्या जात आहेत. नव्या शाखेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनीही भेट देत श्रीनाथ पॅन्टीनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शहरातील कडोलकर गल्ली, प्रकाश टॉकीजसमोरील शाखांप्रमाणेच आता एस.पी.एम. रोडवरील शिवाजी गार्डनसमोरील नव्या शाखेतही ग्राहकांना सकाळपासून रात्रीपर्यंत दर्जेदार शाकाहारी खाद्यपदार्थ आणि पॅटरिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्रीनाथ कॅन्टीन अँड पॅटरर्सच्या व्यवस्थापनाने दिली आहे.
अधिक माहितीसाठी किंवा कॅटरिंग ऑर्डरसाठी 8073220154 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.