For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्ण कथा महोत्सवास इस्कॉनमध्ये प्रारंभ

11:21 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्ण कथा महोत्सवास इस्कॉनमध्ये प्रारंभ
Advertisement

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर, शुक्रवारपेठ-टिळकवाडी येथे गेल्या मंगळवारपासून श्रीकृष्ण कथा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या महोत्सवात भजन, कीर्तन याबरोबरच सायंकाळी कथाकथन व महाप्रसाद झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी आणि बेळगावचे अध्यक्ष प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी आपल्या रसाळ वाणीत श्रीकृष्ण कथाकथनास प्रारंभ केला. हा महोत्सव 27 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ते म्हणाले की श्र्रवण, कीर्तन हा कोणत्याही उत्सवाचा मुख्य भाग असतो.

Advertisement

अनेक भक्त वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात, पण त्यामध्ये श्र्रवण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण श्रीमद् भागवतचे 54 अध्याय पूर्ण केले आहेत. आता 55 वा अध्याय सुरू होत आहे. भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीतलावर 125 वर्षे लीला केल्या. त्यांच्या लीलांमध्ये बाललीला, पौगंड लीला, ऐश्वर्य लिला अशा अनेक लीलांचा समावेश आहे. साधारण साडेदहा वर्षांपर्यंत ते वृंदावनमध्ये राहिले. त्यानंतर त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षांपर्यंत मथुरा येथे आपल्या लीला केल्या. त्यानंतर सुमारे शंभर वर्षे त्यांनी द्वारकेमध्ये लीला केल्या. त्यामुळे त्यांच्या या द्वारकालीला अतिशय महत्त्वाच्या आहेत,अशी माहिती देऊन त्यांनी द्वारकेमध्ये भगवंतांनी केलेल्या अनेक लीला प्रस्तुत केल्या, ज्यामध्ये भगवंतांचा ऊक्मिणीबरोबरचा विवाह याचाही समावेश  होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.