For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विज्ञान नाटिका स्पर्धेत वेतोरेच्या श्रीदेवी सातेरी हायस्कूलचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

12:44 PM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
विज्ञान नाटिका स्पर्धेत वेतोरेच्या श्रीदेवी सातेरी हायस्कूलचा प्रथम क्रमांक  जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर) : शासनाच्या शिक्षण विभागातर्फे रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ले तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत श्रीदेवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरे यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे वेतोरे विद्यालयाच्या संघाची जिल्हास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Advertisement

‘महासागराचे पुनरुज्जीवन : पिढ्यांचे जतन’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेला परीक्षकांकडून दाद मिळाली. महासागरातील वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा अतिरेक आणि त्याचा सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे भाष्य केले. विषयाची मांडणी, अभिनय आणि सादरीकरणातील नावीन्यामुळे नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

तालुक्यातील विविध शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली यांनी द्वितीय, तर रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ले यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

Advertisement

वेतोरे विद्यालयाच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक समितीचे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष सूर्याजी नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक के. डी. खरबडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन केले.

या नाटिकेच्या लेखिका ओवी पवार तसेच दिग्दर्शक निलेश पेडणेकर यांचेही कौतुक करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत वेतोरे विद्यालयाचा संघ उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Advertisement
Tags :

.