महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अयोध्येतील श्री राम मंदिर, सीएम योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; दोन आरोपींना अटक

03:37 PM Jan 04, 2024 IST | Kalyani Amanagi
Advertisement

अयोध्येतील श्री राम मंदिर, सीएम योगी आणि एसटीएफ प्रमुख यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना एसटीएफने उघडकीस आणली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपींनी धमकीचा ई-मेल पाठवला होता.

Advertisement

एसटीएफच्या तपासात समोर आले आहे की, शेतकरी नेता देवेंद्र कुमार तिवारी, ज्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांनी स्वत: सुरक्षा मिळवण्यासाठी आणि मोठा नेता बनण्यासाठी त्याच्या कर्मचाऱ्यांना धमकीचा मेल पाठवण्यास सांगितले होते. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शेतकरी नेता, त्याचा ड्रायव्हर सुनीत आणि कटात सहभागी असलेला दुसरा युवक प्रभाकर यांचा शोध सुरू आहे.

Advertisement

एसटीएफचे डेप्युटी एसपी प्रमेश कुमार शुक्ला यांनी सांगितले की, गोंडाचे रहिवासी तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. देवेंद्र तिवारी यांना सुरक्षा हवी होती, असे तपासात समोर आले. त्यामुळे याप्रकरणाचा एक भाग म्हणून त्याने स्वतःला धमकीचा ई-मेल पाठवला. श्री राम मंदिर, सीएम योगी आणि एसटीएफ प्रमुख जोडले गेले जेणेकरून हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत येतील. डेप्युटी एसपींनी सांगितले की, या प्रकरणातील देवेंद्र आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे.

 

 

Advertisement
Tags :
#Yogiblow upbombscmyogishriramtemple ayodhyathreatened
Next Article