For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चरेगाव येथील श्रीराम मंदिर मूर्ती विटंबना प्रकरण; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

01:27 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
चरेगाव येथील श्रीराम मंदिर मूर्ती विटंबना प्रकरण  संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Advertisement

                चरेगावच्या श्रीराम मंदिरातील मूर्तींची तोडफोड, एकाला अटक

Advertisement

उंब्रज - कराड तालुक्यातील चरेगाव येथे गुरुवारी २ रोजी श्रीराम मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्या प्रकरणी उंब्रज पोलीसांनी एकास ताब्यात घेतले असून संशयित आरोपीचे नाव ओमकार विलास शिलेवंत वय २३ राहणार चरेगाव ता. कराड असे आहे. दरम्यान संशयित आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, चरेगाव येथील प्रार्थना स्थळी घडलेली घटना ही एका मनोरुग्ण व्यक्तीकडून घडलेली असून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधितास ताब्यात घेऊन त्यास वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेचा कोणताही जातीय किंवा धार्मिक संबंध नसून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन करण्यात आले आहे. चुकीची माहितीअफवा किंवा तणाव निर्माण करणारे संदेश पसरविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात असे उंब्रज पोलीसांनी सांगितले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.