For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आज तरुणाईसाठी व्याख्यान

10:31 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आज तरुणाईसाठी व्याख्यान
Advertisement

समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने शनिवार दि. 10 रोजी समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचा तरुणपिढीला संबोधित करणारा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. तरुणपिढीमधील वाढत्या आत्महत्या, शारीरिक शोषण, व्यसनाधीनता, पालकांचे दुर्लक्ष, संस्कार आणि धर्मरहित जीवन, बालकांची कर्तव्ये, समाजाचे कर्तव्य यासह इतर विषयांवर ते तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. आजची तरुणपिढी शारीरिक आणि मानसिक दडपणाखाली वावरत आहे. त्यामुळे आत्महत्या आणि दिशाहिनता वाढली आहे. याचाच परिणाम तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळताना दिसून येत आहे. त्यासाठी संस्कारांचे बळ आणि सुरक्षिततेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही समस्या सोडवून मुलांना नैतिक बळ देण्यासाठी वसंत हंकारे मार्गदर्शन करणार आहेत. वसंत हंकारे यांनी महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये मार्गदर्शन केले आहे. ‘विद्यार्थ्यांना वाढवताना आई-बाबांना होणाऱ्या वेदना’ या विषयावर ते बेळगावमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.