शोभायात्रेत होणार हिंदुत्व, राष्ट्रप्रेमाचे अभूतपूर्व दर्शन
रामकथा कार्यक्रमाला २२ तारखेला मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती
'आयोध्यानगरी'त १७ जानेवारी पासून रंगणार श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळा
सांगली
आयोध्येतील मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सांगली मध्ये १७ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत श्रीराम कथा व श्रीनामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये संत श्री समाधान महाराज शर्मा हे श्रीराम कथेचे कथन करणार आहेत. तसेच या दरम्या ११ किर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सर्व राष्ट्रीय किर्तनकारांचा समावेश आहे. तसेच सर्व फडातील संतांनाही या कार्यक्रमासाठी पाचारण केलेले आहे. सांगली जिल्ह्यातील समस्त वारकरी संप्रदायही या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. रघुनंदन महाराज पुजारी यांचे अडीचशे शिष्य या सोहळ्यात सहभागी होत आहेत, अशी माहिती राम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली.
पुढे सारडा म्हणाले, दररोज राम कथा वाचनासोबतच विविध उत्सव साजरे होणार आहेत. तसेच सायंकाळी किर्तन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. २२ तारखेला दुपारी ४ वाजता राम विवाह सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही संतांचे सत्कार होतील. २७ तारखेला शेवटचे किर्तन झाल्यानंतर महादिंडीचेही आयोजन करण्यात आले आहे.