For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री लक्ष्मीदेवी ओटी भरणे कार्यक्रम अमाप उत्साहात

11:06 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्री लक्ष्मीदेवी ओटी भरणे कार्यक्रम अमाप उत्साहात
Advertisement

गल्लोगल्ली महिला मंडळांकडून श्री लक्ष्मीदेवीला साडीचोळीसह दागिने अर्पण

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

गावच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी दररोज अलोट गर्दी होत असून सोमवारीसुद्धा श्री लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. बुधवार दि. 29 पासून सुरू असलेल्या घरोघरी मांसाहार प्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली होती. रविवार दि. 3 रोजी मांसाहार प्रसाद वाटण्याची सांगता झाली. श्री लक्ष्मीदेवीची यात्रेची बुधवार दि. 6 मे रोजी सांगता होणार असल्यामुळे गावातील गल्लोगल्लीतील महिला मंडळांकडून श्री लक्ष्मी देवीला साडी, चोळी दागिने अर्पण करून ओटी भरणे कार्यक्रमाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

Advertisement

सोमवारी मरगाईनगर येथील महिला मंडळाकडून व शास्त्राrनगर येथील महिला मंडळाकडून साडी, चोळी देवीला अर्पण करून ओटी भरुन देवीचा आशिर्वाद घेण्यात आला. यावेळी मरगाईनगर येथील महिला मंडळाकडून श्री लक्ष्मीदेवीला 1 लाख रुपये किंमतीचा दागिना व त्रिशुल देवीला अर्पण केला. सकाळी 10 वाजता श्री मरगाई मंदिर येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीला पारंपरिक वाद्याच्या निनादात व भंडाऱ्याची उधळण करत तसेच श्री लक्ष्मीदेवीचा जयघोष करत मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. श्री लक्ष्मीदेवी माता की जय, श्री लक्ष्मीदेवीच्या नावानं चांगभलं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की... जय अशा घोषणा देत हिंदुत्व व धार्मिकतेच्या संगमाचे उदाहरण देण्याचे काम सदर मंडळांकडून होत असल्याचे दिसून आले.

चोख नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन

श्री लक्ष्मीदेवी गदगेचे ठिकाणी बालाजी तिरुपती मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून अशा या भव्य दिव्य मंदिरमध्ये श्री लक्ष्मीदेवी गदगेवर आरुढ झाली आहे. भाविकांना दर्शन घेतेवेळी कोणतीही अडचण येवू नये याची दक्षता घेवून मंदिरमध्ये भाविकांना दर्शनासाठी आत येण्याचा हा रस्ता सुलभ बनविण्यात आला आहे. तसेच दर्शन घेवून बाहेर जाणारा रस्तासुद्धा अगदी सुलभ बनविल्यामुळे भाविकांना श्री लक्ष्मीदेवीचे अगदी सुलभ दर्शन मिळत असल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.