For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथे 29 जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव

श्रीक्षेत्र दत्त मंदिर  मूळस्थान – वायरी बांध येथे 29 जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव
Advertisement

श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध, मालवण येथे प्रतीवर्षाप्रमाणे परमपूज्य श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज संप्रदाय यांच्या वतीने बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त सकाळी 8.00 वाजता जगद्गुरू श्री दत्त महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, तर सकाळी 9.00 वाजता परमपूज्य श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक होणार आहे. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती व दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

सायंकाळी 7.30 वाजता धूपारती, रात्री 8.00 वाजता गादी पूजन व दर्शन सोहळा तसेच रात्री 9.00 वाजता संप्रदायिक भजन होणार असून, दिवसभर भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या पवित्र गुरुपौर्णिमा उत्सवाला उपस्थित राहून श्रींचे दर्शन, पूजन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा**, असे आवाहन संप्रदायचे कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.