श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दत्तात्रयांचा रंगला पालखी सोहळा
दत्तजयंतीनिमित्त दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिरातर्फे आयोजन : नगरप्रदक्षिणा मार्गात पालखी थाटात स्वागत, पावलो-पावली अष्टगंधाची उधळण
कोल्हापूर
दिगंबरा...दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...असा अखंड नामजप करत रविवारी आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिराच्यावतीने दत्तात्रयांचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला. दत्तजयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या पालखी सोहळ्यात दिड हजारावर भाविक सहभागी झाले होते. पालखीसोबतचा भगवी निशानी, कर्नाटकी वाद्य, बेंजो, दोन घोडे, हलगी असा लवाजमा सोहळ्याची शोभा वाढवत होता. शिवाय पालखी ज्या मार्गावऊन प्रयाण करत होती त्या मार्गावरील अनेक भाविक श्री गुऊदेव दत्तचा नामजप करत लवाजम्यात सहभागी होत होते. पुलगल्ली तालीम मंडळाने पालखीचे थाटात स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी तालमीसमोर फुले, रांगोळीचा गालिचा तयार केला होता. लाडू प्रसादाचे वाटप कऊन पालखीसोबतच्या भाविकांचे तेंडही गोड केले.
दरम्यान, सकाळी श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिराचे पुजारी बाळासाहेब दादर्णे यांच्यासह अन्य पुजाऱ्यांनी मंदिरातील दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक कऊन महापूजा बांधली. त्यांनी सप्तरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीत दत्तात्रयांच्या पादुकांसह मूर्ती विराजमान केली.
यानंतर माजी नगरसेवक सत्यजित कदम, विनायक फाळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती सचिव शिवराज नाईकवाडे, दिनेश बुधले यांच्या हस्ते पालखीचे पुजन केले. दिगंबरा...दिगंबरा, श्री गुऊदेव दत्तचा नामजप करत मानकरी व भाविकांनी पालखीला खांद्यावर घेत नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान केले. यानंतर पालखी बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, जुना राजवाडा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लुघडी ओळ, भोई गल्ली, सुभाषनगर रोड, उमा चित्रमंदिर, पुलगल्ली तालीम, आझाद चौक आदी मार्गावऊन फिऊन पुन्हा दत्त भिक्षालिंग देवस्थान मंदिरात आली. संपूर्ण पालखी मार्गात केलेल्या अष्टगंधाच्या उधळणीने भाविक न्हाहून निघाले होते. मार्गातील विविध मंडळे, भक्तांनीही पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले. पालखी सोबतच्या भाविकांचा योग्य तो पाहूणचार करत त्यांना लस्सी, दुध, केळी, लाडू, फळांचा वाटप केले. दरम्यान, पालखी सोहळ्याची सांगता झाल्यानंतर मंदिराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा तब्बल दहा हजारावर भाविकांनी लाभ घेतला. भाविकांच्या पोटाला चार घास भरवण्यासाठी दिडशेहून अधिक भक्त स्वयंस्फुर्तीने सक्रीय होते.