For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळेवाड येथे ८ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

05:44 PM Feb 05, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मळेवाड येथे ८ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

मळेवाड हेदुलवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिनानिमित्त रविवार ८ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार ८ रोजी सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक आणि महाराजांची महापूजा,सकाळी ९.३० ते १२ वाजता राम ह्रदय स्रोत अनुष्ठान,दुपारी १२.३० ते १ पर्यत महाराजांची महाआरती प्रकट समय,दुपारी १ ते ३ पर्यत महाप्रसाद,दुपारी २ ते ५ पर्यत,गायन आणि भजनाचा कार्यक्रम संगीत स्वररजनी,सायंकाळी ५ ते ६.३० पर्यत ओकांर प्रासादिक भजन मंडळ,सरमळे यांचा भजनाचा कार्यक्रम,रात्री ७ वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा,रात्री ८.३० वाजता महाआरती,रात्री ९.३० वाजता रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी प्रस्तुत लेखक वैभव परब व दिग्दर्शक रुपेश कवठणकर यांचे दोन अंकी विनोदी नाटक ' आलाय मोठा शहाणा ' हा नाट्यप्रयोग होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाविकांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.