गणित संबोध परीक्षेत श्री देवी यक्षिणी विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत गुण मिळवत गणित विषयातील आपली गुणवत्ता सिद्ध केली.
परीक्षेत लक्षिता विशाल तोरगळे हिने ९० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मैथिली दत्तात्रय पालव आणि असद अजमल शेख यांनी प्रत्येकी ८८ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तर मैथिली महेश सावंत आणि सुयश संजय धुरी यांनी प्रत्येकी ८६ गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या गणित शिक्षिका सौ. वैदेही भोगले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फलित या निकालातून दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सगुण धुरी, सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंदराव साटम, पालक-शिक्षक समितीचे उपाध्यक्ष सोमा कदम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशामुळे श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
