भोसले कुटुंबियांच्या वतीने तिरोड्यात श्री देव पाटेकराचा वाढदिवस
सावंतवाडी । प्रतिनिधी
श्री देव पाटेकर यांचा वाढदिवस तिरोडा येथे भोसले कुटुंब यांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला हजारो पाटेकर भक्तांनी श्री देव पाटेकर यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले . यावेळी सावंतवाडी संस्थांनचे राजे खेम सावंत भोसले व युवराज लखम सावंत भोसले यांनी श्री देव पाटेकरचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, रवींद्र भोसले व संपूर्ण भोंसले कुटुंबीय व तिरोडा ग्रामस्थ यांनी खेमसावंत भोसले , लखम भोसले यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यापूर्वी राजेसाहेब व युवराज यांना ढोल ताशा वाजंत्रीसहित भोंसले कुटुंबातील सुहासिनीनी ओवाळून भव्य स्वागत केले. या भक्तिमय कार्यक्रमात खासे कुटुंब तिरोडा गावच्या सरपंच, उपसरपंच व या दशक्रोशीतील असंख्य पाटेकर भक्त सहभागी झाले होते. रात्री राजे श्री भवानी शंकर महाराज यांचे मार्गदर्शन, खासेवाडी भजन मंडळाचे संगीत भजन, आतिषबाजी व चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा असंख्य भक्तांच्या उपस्थितीत "शिव भक्त शबर" नाटकाचा प्रयोग होऊन कार्यक्रम भावपूर्ण झाला.