For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिरजोळेतील वाडकर परिवाराचा 'श्री देव भैरी मंदिर देखावा' अव्वल !

11:46 AM Aug 31, 2025 IST | Radhika Patil
मिरजोळेतील वाडकर परिवाराचा  श्री देव भैरी मंदिर देखावा  अव्वल
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

रत्नागिरीतील छायाचित्रकार कांचन मालगुंडकर आयोजित कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा दिमाखात पार पडली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. स्पर्धेत तालुक्यातील मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथील आशिष वाडकर आणि परिवाराने हुबेहूब साकारलेला श्री देव भैरी मंदिर देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

प्रतिवर्षपिक्षा यंदा या स्पर्धेत तालुकाभरातून अधिक स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदवला. एकूण ११५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. गणेशभक्तांनी अगदी मनोभावे सजावट व पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक असे विविध देखावे सादर केले होते. गणेशभक्तांनी असे देखावे, सजावट तयार करावी, हे प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे कांचन मालगुंडकर यांनी यानिमित्ताने सांगितले. स्पर्धेला उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार किरण तथा भैय्या सामंत यांनी दखल घेत मोलाचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेचे यंदा ६ वे वर्ष होते. यंदा शहरापेक्षा ग्रामीण भागातील गणेशभक्तांनी सादर केलेले देखावे थक्क करणारे होते. वैशिष्ट्यपूर्ण तसेच मुख्यत्वे इकोफ्रेंडली सजावट व देखाव्यांना प्राधान्य देत परीक्षकांनी निकाल जाहीर केला आहे. अर्थातच यामध्ये सहभागी सर्वच स्पर्धकांचे परीक्षकांनी कौतुक केले. परीक्षक मंडळात कांचन मालगुंडकर, नरेंद्र पाटील, अभिजित नांदगावकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, नीलेश जगताप, मुकुंद पिलणकर, शकील गवाणकर, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर, अजिंक्य सनगरे आदींचा समावेश होता. लवकरच या स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Advertisement

  • कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५चा सविस्तर निकाल

प्रथम क्रमांक (१५ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)- श्री देव भैरी मंदिर देखावा, लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे (आशिष वाडकर).

द्वितीय क्रमांक (१० हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) – संत एकनाथ महाराज देखावा ( राहुल पाडावे, एकता परिवार, मिरजोळे).

तृतीय क्रमांक (६ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) – रेड्यामुखी वेद, संत ज्ञानेश्वर (संतोष कुड, पड्यारवाडी, गावखडी).

▶ सुबक गणेशमूर्ती - (३ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), साईराज वाडकर (लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे), वामन सुवारे (फगरवठार, साळवी बंधू देखावा )

विशेष उल्लेखनीय - (१ हजार ५००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) चारुदत्त धालवलकर (केदारनाथ देखावा, गावखडी). संजय वर्तक (शाळा दुरुस्ती देखावा, कुवारबाव), तरळ बंधू (सुंभसजावट, भाट्ये) संदीप मेस्त्री (लोंगेवाला युद्ध, जयगड), जीवन कोळवणकर (मत्स्यावतार, कुवारबाव), श्रीपाद शिवलकर (जीवन क्षणभंगूर, बसणी), मयूर भितळे (सांबरे हॉस्पिटल, सोमेश्वर), सुहानी गोताड (शिवकालीन देखावा, कोतवडे)

उत्तेजनार्थ पारितोषिक (१ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), कौस्तुभ आंबेकर (केदारेश्वर, मिरजोळे), सलोनी शेलार (पर्यावरणाचा सन्मान, रत्नागिरी), रमेश माचकर (झाडे जगवा, शिरगांव), शशांक शिंदे (गड-किल्ले, वेतोशी), दीपिका कुबल (वारली पेंटिंग, बंदर रोड, किल्ला)

प्रोत्साहनपर पारितोषिक (५०० रूपये व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), वेद लोंढे (शिवपिंडी, शिरगांव), स्वप्निल ठिक (कल्पवृक्ष, शिरगांव), अविनाश शिंदे (जेजुरी, जांभरूण), यश कानडे (एकविरा आई, फणसवळे), चंद्रकांत माने (पंढरीची वारी, केळ्ये), मनोज भाटकर (मंदिर, भाट्ये), सर्वेश मेस्त्री (जि.प. शाळा बचाव, नाखरे)

Advertisement
Tags :

.