कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिरोळमध्ये श्रीदत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा

03:57 PM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
Shri Datt Jayanti celebrated with enthusiasm in Shirol
Advertisement

सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर
अबीर,फुलांची उधळण व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....श्री गुरुदेव दत्त....असा जयघोष करीत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शिरोळ येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात ‘श्रीं‘चा जन्मोत्सव सोहळा अमाप उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. मंदिरात दर्शनासाठी अबाल वृद्धासह भाविकांची मोठी गर्दी केली होती.

Advertisement

येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र उत्सव समितीच्या वतीने आज रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते.येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे श्री दत्त जयंती निमित्त गेले सात दिवस भजन, कीर्तन,प्रवचन यास अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू असून भोजनपात्र मंदिरात पहाटे अभिषेक,महापूजा, धुपारती, नित्य पालखी सोहळा केला जात आहे.
श्री दत्तगुरु महाराज यांनी भोजन केल्याने या ठिकाणी हाताचे ठसे आहेत.आजही श्रींची हस्तपूजा नित्यनेमाने केली जाते.आज रविवारी पहाटे सव्वा पाच वाजता काकड आरती व नित्य पूजा झाली.त्यानंतर दुपारी ठीक 12 वाजून 15 मिनीटानी मंदिरामध्ये अबीर,फुलांची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....श्री गुरुदेव दत्त....असा जयघोषात श्रींचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Advertisement

श्री दत्त नामाचा जागर करीत भाविकांनी मनोभावे ‘श्री‘ची आराधना केली.श्री दत्त गुरु भोजन पात्र मंदिरात श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळाच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचे वाटप केले जाते.रविवारी दुपारी बारा वाजता श्री दत्त गुरु भोजन पात्र मंदिरात ‘श्री‘चा जन्मोत्सव झाल्यानंतर श्री दत्त जयंती महाप्रसाद समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी धूप,अभिषेक,महापुजा सोहळा पार पडला. यावेळी मुख्य पुजारी सर्वेष अजित कुलकर्णी,दिपक कुलकर्णी,वेदमूर्ती अनिकेत जोशी महाराज,चैतन्य चारुदत्त कुलकर्णी,स्वानंद कुलकर्णी,श्रेयस देशपांडे, अनुज अवधूत देशिंगकर,गुरुप्रसाद दीपक कुलकर्णी, इंद्रसेन अनिकेत जोशी तसेच दत्तगुरु भोजनपात्र मंदिर सेवेकरी,श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळ शिरोळ कार्यकर्ते व भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात दत्त जयंती उत्सव संपन्न झाला.

दत्त जयंतीनिमित्त प्रथमच रक्तदान शिबिर
शिरोळ येथील श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळ शिरोळच्या वतीने आज दत्त जयंतीनिमित्त यावर्षी प्रथमच हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड सेंटर सांगली यांच्या सहक्रायाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्याला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article