For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Navratri 2025 Ambabai Temple : भक्तीमय वातावरणात श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न !

03:58 PM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
navratri 2025 ambabai temple   भक्तीमय वातावरणात श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न
Advertisement

     1 लाख 92 हजार भाविकांनी देवीचे घेतले दर्शन 

Advertisement

कोल्हापूर - डोळे दिपवणारी रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजीमध्ये श्री अंबाबाई-तुळजाभवानीची भेट झाली. अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी रात्री करवीर निवासिनी अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा 'आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं च्या जयघोषात झाला, दरम्यान मंगळवारी १ लाख ९२ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले

अंबाबाईचा गजर करत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणा सोहळ्याला उत्साहात रात्री साडे नऊच्या सुमारास प्रारंभ झाला. अंबाबाईच्या तोफेची सलामी देत वाहनाचे पूजन होऊन नगरप्रदक्षिणा सुरू झाली. अंबाबाई वाहनात बसून महाद्वार दरवाज्यातून बाहेर पडून गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून गेली. दरम्यान तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर तुळजाभवानीचा आणि अंबाबाई भेटीचा सोहळा रंगला. यावेळी छत्रपती घराण्यातर्फे देवीची ओटी भरण्यात आली. मानाचे विडे देण्यात आले.

Advertisement

दरम्यान, नगरप्रदक्षिणेच्या मार्गात भाविकांकडून फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी देवीचे स्वागत करण्यात आले. नगरप्रदक्षिणा म्हणजे देवी शहर वासियांच्या भेटीसाठी मंदिरातून बाहेर पडते, असे मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारातून निघालेली नगरप्रदक्षिणा महाद्वार रोडमार्गे गुजरीतून बिनखांबी गणेश मंदिरापासून पुन्हा मंदिरात पोहोचते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तकियन एस. यांनी देवीच्या पालखीचे पूजन केले. त्यानंतर रात्री .३० वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीचे वाहन नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.

देवीच्या स्वागतासाठी प्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घातल्या. गुजरी कॉर्नर मंडळ, अन्य मंडळांसह महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आणि भाविकांकडून ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. मार्गावर दुतर्फा बिद्युत रोषणाई होती. महाद्वारातून गुजरी, भाऊसिंगजी रोड या पारंपरिक मार्गावरून पालखी भवानी मंडपात आली. तेथे अंबाबाई आणि तुळजाभवानीची भेट झाली. येथे छत्रपती घराण्याकडून आरती करण्यात आली. तेथून देवीचे वाहन मिरजकर तिकटी मार्गे गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले.

बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वाहन रात्री बारानंतर पुन्हा महाद्वारातून मंदिरात पोहोचले आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची जागराची पूजा बांधली. श्रीपुजकांच्या हस्ते महाकाली मंदिरासमोर अष्टमीचा होम झाला. दरम्यान, नगरप्रदक्षिणा मार्गावर कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

नगरप्रदक्षिणेचे महत्त्व

नवरात्रोत्सवात नवव्या माळेला मंगळवारी रात्री हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. अंबाबाईने अष्टमीच्या रात्री महिषासुराचा वध केला, म्हणून फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा निघते.

Advertisement
Tags :

.