For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मुपापा’ चित्रपटात श्रेयी चौधरी नायिका

06:01 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मुपापा’ चित्रपटात  श्रेयी चौधरी नायिका
Advertisement

आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका

Advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीचा दमदार अभिनेता आयुष्मान खुराना आगामी काळात ‘मुपापा’ या चित्रपटात दिसून येणार आहे. ‘मुपापा’ या चित्रपटासाठी मुख्य नायिकेचा निर्मात्यांचा शोध पूर्ण झाला आहे. ओटीटीवरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची याकरता निवड झाली आहे. आयुष्मानची मुख्य भूमिका असलेल्या ‘मुपापा’ चित्रपटात बंदिश बँडिट्स वेबसीरिज फेम अभिनेत्री श्रेया चौधरी दिसून येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटासाठी तिच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. श्रेयाचा अभिनेत्री म्हणून पहिल्यांदाच एखादा चित्रपट चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘मुपापा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सक्सेना करत असून याची निर्मिती पोशम पा पिक्चर्स प्रॉडक्शन हाउसकडून होतेय.

तसेच हा प्रोजेक्ट यशराज फिल्म्स आणि ‘पोशम पा पिक्चर्स’दरम्यान पहिली थिएट्रिकल पार्टनरशिप आहे. या चित्रपटाची कहाणी आणि कलाकारांविषयी अधिक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु हा चित्रपट प्रेक्षकांना एक नवा व्हिज्युअल अनुभव मिळवून देणार अशी अपेक्षा आहे. आयुष्मानचा हा चित्रपट 19 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.